पोलीस प्रवाह न्युज
माणगांव, दि. २- येथील प्रख्यात दंतवैद्य, पंचायत समिती माणगाव माजी सभापती प्रभाकरदादा उभारे यांचे सुपुत्र डॉ. परेश (अमेय) उभारे यांची डॉक्टर्स डे निमित्ताने दि. १ जुलै रोजी आयोजित सभेमध्ये एकमताने माणगाव मेडिकोजच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. डॉ. उभारे हे अत्यंत मनमिळावू, मितभाषी, शांत, संयमी असून त्यांनी सुमारे २० वर्षापासून त्याच्या क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे.
यावेळी विद्यमान अध्यक्ष डॉ. स्नेहा राऊत, डॉ. बी.जे. शिंदे, डॉ. गौतम राऊत, डॉ. आबासाहेब पाटणकर, डॉ. अजय मेहता, डॉ. अभिजीत मेहता, डॉ. श्रीक्रांत वैद्य, डॉ. भावे व इतर डॉक्टर्स उपस्थित होते.
नूतन अध्यक्ष डॉ. परेश उभारे हे अध्यक्षपद अतिशय चांगल्या प्रकारे हाताळून ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली सेवा मिळेल अशी अपेक्षा जनतेमध्ये आहे. त्यांना योग्य न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे यावेळी डॉ. उभारे यांनी सांगितले. सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालिसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.




































