पोलीस प्रवाह न्युज
माणगाव – दि. ३०- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथील एनसीसी अधिकारी मेजर मिलिंद भगत यांना एनसीसी महासंचालक (DG NCC) यांच्याकडून “ऑन-द-स्पॉट डीजी कमेंडेशन कार्ड” देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र संचालनालयात आज पार पडलेल्या विशेष सत्कार समारंभात DG NCC यांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून निवड झालेल्या एकमेव ANO म्हणून मेजर भगत यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. त्यांच्या अनुकरणीय कार्याबद्दल आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा, शिस्त व सेवाभाव रुजवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची ही अधिकृत पातळीवर दखल घेण्यात आली.

त्यांच्या कार्याची दखल घेत DG NCC यांनी त्यांचे कौतुक करत भविष्यातही उत्तम कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यशाच्या या टप्प्यावर मेजर भगत यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या या यशामुळे विद्यापीठासह राज्यातील इतर NCC युनिट्सना प्रेरणा मिळाली आहे.




































