कोल्हापूर | शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांप्रमाणे शालांत पूर्व शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये महाडीबीटी प्रणालीव्दारे शिष्यवृती मिळण्याकरिता अर्ज स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
यासाठी जिल्ह्यातील सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये सामान्य शाळेतील 1 ते 10 या इयत्तेमध्ये शिकणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याच्या कार्यवाही संबंधित शाळा/कार्यशाळेच्या मुख्याध्यापकांनी करावयाची आहे. शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची कार्यवाही करण्याकरिता शाळा स्तरावर युजर नेम, पासवर्ड उपलब्ध करुन देण्यात आले असून 1 ली ते 10 वी मध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले आहे.
Recent Posts
पोलीस प्रवाह न्युज माणगाव, दि. २४- निजामपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पाटणूस पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. पाटणूस पंचायत समिती गणात गाव बैठका, गाठीभेटी यांचा जोर वाढला असून राष्ट्रवाद... Read more





































