पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १२- तालुक्यातील गोरेगाव विभागातील देवळी गावचे सुपुत्र सूर्यकांत शांताराम सुतार वय वर्षे ४० यांचे नुकतेच अल्पशा आजारामुळे मुळे निधन झाले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सुतार कुटुंबातील सूर्यकांत हे चार भावंडांमधील सर्वात धाकटे होते. लहानपणी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत दिवस काढावे लागले. मात्र परिस्थितीवर मात करत भावंडांनी विविध क्षेत्रांत प्रगती साधली. एक भाऊ अभियंता म्हणून सिंगापूर येथे कार्यरत आहे, दुसरा पोलीस सेवेत आहे. तर तिसरा खासगी कंपनीत नोकरीला आहे.
सूर्यकांत यांनी देखील त्यांच्या घरची जबाबदारी कमी वयात उचलली. ते संयमी आणि शांत स्वभावाचे होते. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून ते मुंबईला गेले. सुरुवातीला त्यांनी सुरक्षा रक्षकाची नोकरी केली. परंतु शिक्षणाची ओढ कायम ठेवत त्यांनी नोकरीसोबत इंटेरियर डिझायनिंगचे तीन वर्षांचे शिक्षण पूर्ण केले. सूर्यकांत यांच्या पश्चात पत्नी व ८ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांचे दशक्रिया विधी गुरुवार १८ सप्तटेंबर रोजी तर बारावे उत्तरकार्य शुक्रवार १९ सप्टेंबर रोजी देवळी येथे ठिकाणी राहात्या घरी होणार
शिक्षण पूर्ण होताच एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली. त्याचबरोबर त्यांनी स्वतंत्रपणे इंटेरियर डिझाइनचे करार घेत काम करण्यास सुरुवात केली. शून्यातून आपले स्वतःचे विश्व निर्माण करून अल्पावधीतच त्यांनी स्वतःची ओळख उभी केली. त्यांच्या कष्टाळूपणामुळे आणि कलागुणांमुळे त्यांना समाजात विशेष मान्यता मिळाली. परंतु दुर्दैवाने आजारपणाने त्यांना ग्रासले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने इंटेरियर डिझायनिंग क्षेत्रासह गावातही हळहळ व्यक्त होत आहे.