पोलिस प्रवाह न्युज
माणगाव – दि. १२- सामाजिक उपक्रमात रायगड जिल्ह्यात नावलौकिक कमाविलेल्या माणगाव शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्थेतर्फे सोमवार दि. १२ मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथील परिचारिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सलीम शेख, कार्याध्यक्ष तथा राजिपचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरुणा पोहरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक देशमुख, डॉ. जगदीश पटेल, संस्थेचे सचिव तथा केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षक शंकर शिंदे, सल्लागार निर्मलसिंग रंधावा, किशोर झेमसे, रक्तदान शिबीर समितीच्या सल्लागार तथा आदर्श शिक्षिका अपूर्वा जंगम, सदस्या शुभांगी सोनावणे, सामाजिक कार्यकर्ते संजय गांधी आदींसह उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी व परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आधुनिक नर्सिंगच्या प्रणेत्या फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंती निमित्त दरवर्षी दि.१२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दरवर्षी हा दिवस मोठया उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक अरुणा पोहरे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालय माणगाव याठिकाणी उपजिल्हा रुग्णालयातील सहाय्यक अधिसेवीका – लता राठोड, परिसेविका – शिवकांती गवळी, अर्चना मोकाशी, तेजस्विनी सुखदरे, सानिका पवार, अस्मिता तांबडे, अधिपरिचारिका – अस्मिता सारंग, रुपाली शिबे, अनिता करकरे, वनिता तेटगुरे, निकिता चौधरी, दीपाली नेमाणे, सोनाली गजने, सुरज महाडिक, अपर्णा उपाध्ये, निकिता सोनावणे, श्रूती चव्हाण, लता माजीक, प्रगती कदम, स्मिता सावळकर, नीता राठोड, श्रद्धा शिंदे, शामल दळवी, शीतल शेंडगे, प्रणिता मनवळ, माधुरी कोकरे, साक्षी शिर्के, तनुजा पाटील, तृप्ती पाटोळे, स्नेहल सावंत, शिवानी गोंधळी, ऋतिक चोगले, सोनाली मांगले, अनुराधा राऊत, शुभांगी वाघमारे, पूर्वजा पाटील, विनिता वारेकर, मौलिका सोलंकी आदी परिचारिकांचा माणगाव शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्थेतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरवातीला आधुनिक नर्सिंगच्या प्रणेत्या फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर भारत – पाक युद्धातील भारतीय शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माणगाव शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्थेचे कार्याध्यक्ष तथा राजिपचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरुणा पोहरे यांनी आपल्या शुभेच्छापर मार्गदर्शनात उपस्थित परिचारकांना आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. परिचारकांचा सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आदर्श शिक्षिका अपूर्वा जंगम यांनी केले.




































