पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव, दि. १८- रोहा येथे १७ ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा मिक्स बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धेसाठीचे राज्य निवड चाचणी पार पडली. या स्पर्धेचे आयोजन रोहा तालुका मिक्स बॉक्सिंग असोसिएशन यांनी केले होते. या स्पर्धेत माणगाव तालुक्यातील पळसगाव खुर्द येथील कु. संस्कृती संतोष सुतार हिला सुवर्णपदक मिळाले. कु.संस्कृती ही इयत्ता पाचवी ची विद्यार्थिनी असून ती आदर्श प्राथमिक विद्यामंदिर उतेखोल (जंगम स्कूल) येथे शिक्षण घेत आहे. रायगड जिल्हा मधील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा, येणाऱ्या शालेय स्पर्धेत त्यांनी अधिकाधिक पदके मिळवावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
यामध्ये रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील १०० विद्यार्थ्यांमध्ये ही स्पर्धा पार पडली.
या विद्यार्थ्यांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास प्रशस्तीपत्र व मेडल देण्यात आले. यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड रायगड जिल्ह्याकडून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली. यात प्रमुख पाहुणे मिक्स बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांचे सचिव सचिन शिंगोटे सर तसेच महाराष्ट्र मिक्स बॉक्सिंग अध्यक्ष श्रीमती कोमलताई शिंदे मॅडम, रायगड जिल्हा अध्यक्ष वृषल गोवर्धने सर व महाराष्ट्र टीम कोच राकेश पाटील सर हे सर्व मंडळी उपस्थित होते. आयोजक रोहा तालुका अध्यक्ष ओमकार हजारे सर यांच्या नियोजनात हि स्पर्धा उत्तमरीत्या पार पाडली.
या स्पर्धेमध्ये माणगाव तालुक्यामधून बरेच स्पर्धक गेले होते. त्यातील काही स्पर्धाकांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त झाले. संस्कृती सुतार हिच्यासह ईशा नवले, ओवी कदम, रश्मी पालकर, नीरज पालकर यांनी गोल्ड मेडल पटकावले. दक्ष गोसावी, वंदीत म्हात्रे यांनी सिल्वर मेडल पटकावले. त्यांना त्यांचे प्रशिक्षक वैष्णवी विलास चव्हाण मॅडम, माणगाव तालुका मिक्स बॉक्सिंग अससोसिएशनचे अध्यक्ष विशाल विजयकुमार दळवे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.


































