पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ६- गणेशोत्सव हा आनंद, भक्ती व एकतेचा उत्सव. गावागावांत उत्साहाने साजरा होणाऱ्या या उत्सवात विजेचा अखंड पुरवठा हा नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो. यंदाच्या गणेश चतुर्थीपासून ते चतुर्दशीपर्यंतच्या उत्सव काळात महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या लोणेरे सेक्शनतर्फे नियोजनबद्ध देखभाल करून सुरळीत व अखंड वीजपुरवठा करण्यात आला. सणाच्या काळात विजेचा लहरी खंड न होता भाविकांना अखंडित सेवा मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. लोणेरे सेक्शनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या या कार्यक्षमतेचे कौतुक गावागावांत होत असून विज विभागावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
मेहनतींच्या घामाने उजळला उत्सव
या कार्यामध्ये सहाय्यक अभियंता योगेश बढीया, लाईनमन केशव जांबरे, वायरमन सुरेंद्र शिर्के, हार्षद सालदूर, रुपेश नलावडे, सोमेश्वर काळस्पे, संकेत अंधेरे, भावेश धोंडगे, वृषभ पवार, प्रसाद धाडवे यांनी अपार मेहनत घेतली. दिवसरात्र सेवा देत उत्सव काळात कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला.
चाकरमान्यांकडून जाहीर आभार
गावी आलेल्या चाकरमान्यांसह नागरिकांनी विजेच्या सुरळीत सेवेसाठी विज कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. “सणासुदीच्या काळात विजेची अडचण झाली नाही हेच आमच्यासाठी सर्वात मोठं समाधान,” अशी भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली.
कौतुकाची दाद
लोणेरे विभागाने दाखवलेली तत्परता व जबाबदारी ही खरोखरच कौतुकास्पद असल्याची दाद सर्वत्र मिळत असून आगामी काळातही अशीच सेवा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




































