पोलिस प्रवाह न्युज
माणगाव – दि. ७– डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे अभियंता वसंत २०२५ चा पहिला दिवस दि. ६ मे रोजी उत्साहात पार पडला. या उत्सवात संगीत, रंग, परंपरा आणि आनंद यांचा सुरेख संगम पहायला मिळाला. विद्यार्थ्यांपासून ते प्राध्यापकांपर्यंत सर्वांनी एकत्र येत या सांस्कृतिक पर्वाचा आनंद लुटला.
कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू कर्नल (प्रा.) डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित केले. तसेच डॉ. विकास सरगडे (मुख्य-समन्वयक) यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी, पालक, शिक्षक व क्षिक्षकेतर कर्मचारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला.
पहिल्याच दिवशी पारंपरिक ढोल-ताशाच्या गजराने वातावरण दणाणून गेले. विद्यार्थी आणि प्रेक्षकांच्या जल्लोषात “पारंपारिक दिन” साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनी पारंपारिक पोशाख परिधान करून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले.कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी प्रमुख आयोजकांनी अतिशय चोख मार्गदर्शन केले. त्यामध्ये डॉ. अरविंद किवळेकर (कुलसचिव), डॉ संजय नलबलवार (अधीष्ठता), डॉ. विकास सरगडे (मुख्य-समन्वयक), डॉ. मधुकर डाभाडे (प्राचार्य) यांचा समावेश होता. तसेच डॉ. शिवाजी कराड, श्रीमती. प्रमिला पडवळ, डॉ. गीता महमुणकर आणि दिलीप भिंगारे या समन्वयकांनी अतिशय उत्तम नियोजन केले.

या कार्यक्रमाला डीएफआयआयई (DFIIE), ग्लोबटेक ऍग्रो पल्पिंग, क्लिनसेप सिस्टम्स प्रा. लि., बीएफएसआय एसएससी (BFSI SSC) या उद्योगसमूहांनी उदार प्रायोजकत्व दिले. त्यामुळे उद्योग व शिक्षण संस्थांमधील समन्वय स्पष्ट दिसून आला.
अभियंता वसंत २०२५ मध्ये विविध सांस्कृतिक स्पर्धा आणि मनोरंजनात्मक उपक्रम सादर झाले:
* उत्साही गट नृत्य आणि एकल सादरीकरणांनी प्रेक्षकांची मने जिंकली
* गायन स्पर्धांमधून अप्रतिम संगीत कौशल्याची झलक पाहायला मिळाली
* मजेशीर खेळांमुळे संपूर्ण परिसर हास्याने भारून गेला
* फॅशन शो आणि नाट्यप्रयोगांनी विद्यार्थ्यांची सर्जनशीलता उजागर झाली
सांस्कृतिक पारंपरिकतेपासून आधुनिकतेपर्यंत विविध रंग भरले गेले. कलाकारांच्या सादरीकरणांना टाळ्यांचा कडकडाट दाद लाभली. DJ नाईट हा या कार्यक्रमाचा विशेष आकर्षण होते, जिथे विद्यार्थ्यांनी आनंदाने नाचत आनंद साजरा केला.
“अभियंता वसंत २०२५” हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून, तर एकतेचा, सृजनाचा आणि युवाशक्तीच्या तेजाचा एक उत्सव आहे.



































