पोलीस प्रवाह न्युज
माणगाव- दि. १७- तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत आणि चिंचवलीवाडी ग्रामस्थांनी एसएससी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला आहे. चिंचवली ग्रामपंचायत हद्दीतील कुमार देव मनोज पारेख यांनी ९८.४०% गुण मिळवून माणगाव तालुक्यातील प्रथम स्थान प्राप्त केले असून कुमारी जान्हवी कृष्णा तटकरे यांनी ९८.२०% गुणांसह द्वितीय स्थान प्राप्त केले. तर कुमार मानव संतोष जामदार यांनी ९०% गुण मिळवून स्थानिक शैक्षणिक क्षेत्रात गौरव मिळवला.
यावेळी विद्यार्थ्यांचा सन्मान चिंचवली ग्रामपंचायत आणि चिंचवली वाडीतील ग्रामस्थांनी उर्जा आणि एकात्मतेने विद्यार्थ्यांचे घरी जाऊन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सन्मान सोहळ्यात चिंचवली ग्रामपंचायतचे सरपंच नंदू रमेश पारावे, उपसरपंच किशोर कृष्णा तटकरे, सदस्य सुधाकर रामचंद्र जामदार, सदस्य उत्तम अनंत कांबळे उपस्थित होते. तसेच ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गोविंद भोसले, माजी अध्यक्ष विष्णू काशीराम तटकरे, नवरात्र उत्सवाचे अध्यक्ष अंकुश धोंडू मोरे, काशिनाथ बोले, गजानन भोईर यांसह अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
शैक्षणिक यशाचे महत्त्व
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे चिंचवली गावाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला आहे. या यशाने ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या कष्टाचे फलप्राप्ती स्पष्ट होते. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या या संकल्पनेतून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले असून, पुढील पिढींसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
पुढील वाटचालीस शुभेच्छा
सन्मान समारंभात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आणि करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामस्थांनी म्हटले की, शिक्षणाच्या माध्यमातूनच गावाचा आणि समाजाचा विकास होऊ शकतो आणि विद्यार्थी हेच गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे आहेत.




































