पोलीस प्रवाह न्युज
तळा, दि. २३- मायबाप फाउंडेशन तळाचा करियर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन कन्या शाळा तळे येथे रविवार दि. २२ जून रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमांचे प्रमुख मार्गदर्शक मा.सत्यवान यशवंत रेडकर( कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमा शुल्क भारत सरकार )हे होते.
व्यासपिठावर प्रमुख पाहुणे तहसीलदार स्वाती पाटील, मंडळ अधिकारी किशोर मालुसरे, पत्रकार किशोर पितळे, मायबाप फाउंडेशन अध्यक्ष सुनील बैकर, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भोईर, जिल्हाध्यक्ष विजय येलवे, राज्य सचीव पोलिस पाटील संघटना कमलाकर मांगले शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भास्कर गोळे, वरिष्ठ प्राध्यापक पप्पू मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक सत्यवान रेडकर यांनी १०/१२ वी नंतर विद्यार्थीनी आपले शिक्षण त्यानंतर न थांबवता बरेच काही करण्यासारखं आहे. आजचे युग फास्ट आहे. यु पी एस सी किंवा एम पी एस सी परीक्षांची भीती मनातून काढून टाका. सगळेच डाॅक्टर इंजिनिअर, वकील होता येते. या परिक्षा भारतीय प्रशासकीय सेवेतील असून उच्च पदी नियुक्ती होते ते अनेक नोकऱ्या आहेत मात्र आपण शिक्षण घेत नाही व प्रयत्न करीत नाही. आपल्या असलेल्या शिक्षणाचा कधी प्रसिद्धी केली नाही. जवळपास अकरा डिग्री असून प्रत्येक डीग्रीचा अर्थ सांगून १२ व्या डिग्री ची २४ ता. परिक्षा देत आहे . माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनासाठी करित असतो विनाशुल्क करीत असतो माझ्या कोकणातील भूमीपुत्रासाठी करीत असतो. यामधून मिळणारा आनंद हा मानधना पेक्षा मोठा आहे. मी मानधन घेत नाही. विद्यार्थांनी माझ्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन करियर करावे ही माझी कळकळीची विनंती आहे. या मार्गदर्शनाने जीवनाला कलाटणी मिळू शकते. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटीत व्हा संघर्ष करा याप्रमाणे शिक्षण घेऊन संघटीत करून माझ्या भूमी पुत्रांना शिक्षणासाठी संघर्ष करायला लावतो आहे. आजचे ३४१ वे मार्गदर्शन आहे. जाता जाता एवढंच सांगेन कि “ध्येय वेडा होऊन उद्दिष्ट साध्य करा उच्च शिक्षण घेऊन भवितव्य घडवा”. आई वडिलांचे नांव, गावाचे नांव मोठे करा असे आवाहन केले. यावेळी मान्यवरांचे हस्ते तालुक्यातील १० वी १२वी १ ते ३ क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, पेन, महान विभूतीची पुस्तके व आर्थिक मदत देऊन सन्मानित केला. विषेश सत्कार आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अमिष भौड यांना सन्मानित केले तसेच कु.रिचा विजय येलवे हिचा सत्कार केला.
कार्यक्रमांचे सुत्रसंचलन अमिष भौड, म्हस्के सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.