पोलीस प्रवाह न्युज
माणगाव – दि. २६- तालुक्यातील निजामपूर विभागातील निजामपूर शहरात श्रीकृष्ण यादव गवळी समाज निजामपूर विभाग संस्थेच्या नूतन इमारतीचा “गवळी भवन “भव्य उदघाटन सोहळा दि. ३० मे रोजी सकाळी ११.३० वा. रायगड लोकसभा खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमात सकाळी होमहवन, सत्यनारायण महापूजा, ११.३० वाजता भव्य उदघाटन सोहळा सर्व मान्यवर, देणगीदार, हितचिंतक व समाजबांधव यांचा सत्कार समारंभ, दुपारी महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ व स्नेहभोजन अशी रूपरेषा असणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष निजामपूर विभाग गवळी समाज अध्यक्ष मारुती कासार (गुरुजी) हे भूषविणार आहेत. तर ना. आदिती तटकरे, ना. भरत गोगावले, मा. आ. अनिकेत तटकरे, म. या. चॅ. ट्रस्ट मुंबई अध्यक्ष अजय बिरवटकर, आ. प्रकाश सुर्वे, मा.नगराध्यक्षा स्नेहल जगताप, मा. सरपंच राजाभाऊ रणपिसे, मा. जि. नि. स. सदस्य चंद्रशेखर (बाबुशेठ) खानविलकर, मा. जि. प. सदस्या सुजाता गोपाळ, म. या. चॅ. ट्रस्ट माणगांव रोहा शाखा कार्याध्यक्ष संजय तटकरे, माणगांव रोहा शाखा विश्वस्त बाबाजी रिकामे व जेष्ठ समाजसेवक बिरबल काते आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाला माणगांव तालुक्यातील सर्व समाज बांधव, देणगीदार व हितचिंतक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन निजामपूर विभाग गवळी समाज उपाध्यक्ष घनश्याम तटकरे, सरचिटणीस किरण पागार, खजिनदार गणपत महाडिक, सहसचिव अनिल दर्गे, उपखजिनदार वासुदेव गायकर, विश्वस्त जनार्दन तटकरे, विश्वस्त दिलीप दिघे, विश्वस्त गणेश दिवेकर व सर्व सभासद आणि गवळी समाज बांधवांकडून करण्यात आले आहे.


































