पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १४- तालुक्यातील निजामपूर मोहल्ला येथील ग्रामस्थांनी ना. भरत गोगावले यांच्या ढालकाठी येथील निवासस्थानी शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश केला.
गेली अनेक वर्ष निजामपूर मोहल्ला मधील ग्रामस्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत होते. परंतु ना. भरत गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत निजामपूर शहराध्यक्ष रफिक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १३ सप्टेंबर रोजी ना. भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे ५० कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी अब्दुलहमीद गोडमे, मजीद मांडलेकर, मझर मांडलेकर, हुसेन मांडलेकर, गुलाम सांगले, वाजिद परदेशी, अनिस परदेशी, सत्तार लोखंडे, शाहनवाज लोखंडे, असिफ लोखंडे, शकील लोखंडे, साकीब लोखंडे, जिया परदेशी, अल्तमस जलगावकर, अरमान जलगावकर, हुसेन परदेशी, अमीर खान, जाविद फटाकरे, शैबाज फटाकरे, मझर खान, दानिश खान, सुबान सांगले, अफझल दरवेशी, सुवेद फटाकरे, बक्कर येशवीकर, शौकत सांगले, शैबाझ अखवारे, मोज्जम जलगावकर, हुसैन खान, कासिम जलगावकर इत्यादी ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. तसेच यावेळी निजामपूर विभागातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ना. गोगावले म्हणाले की, या पक्ष प्रवेशाने निजामपूर मध्ये शिवसेना पक्षाची ताकद वाढली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये यांचा परिणाम नक्की होईल. पक्ष प्रवेश केलेल्या सर्व मोहल्ला ग्रामस्थांचे शिवसेना पक्षात स्वागत. विभागातील विकासकामांना गती दिली जाईल. त्यांच्या मागण्यानुसार सर्व विकासकामे पूर्ण केली जातील, असे आश्वासन यावेळी ना. भरत गोगावले यांनी प्रवेशकर्त्यांना दिले.