पोलीस प्रवाह न्युज
तळा, दि. २०- देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी सरकारने भारताला जगात एक ताकदवान देश म्हणून समोर आणले आहे. देशात महामार्ग आणि रेल्वेचे जाळे तयार झाल्याने विकासाची घोडदौड सुरू आहे. रायगड जिल्ह्याचा आणि तळा तालुक्याचा विकास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत असल्याचा दावा राज्यसभा खासदार तथा भाजपा रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केला. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ११ वर्षे पूर्ण केली आहेत २६ एप्रिल २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. मोदी सरकारला ११ वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी कडून “संकल्प से सिद्धि तक” अभियान या कार्यक्रमाचे आयोजन दि. २० जून रोजी श्री गणेश मंगल कार्यालय तळा येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना खा.धैर्यशिल पाटील बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव रवी मुंढे, जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिंदे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, युवक जिल्हा अध्यक्ष नीलेश थोरे, पाली नगरपंचायत उपनगराध्यक्ष आरिफ मनेर ,माजी जिल्हा महिला अध्यक्षा हेमा मानकर, माजी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे, माजी अध्यक्ष ॲड. नीलेश रातवडकर, तालुका अध्यक्ष रितेश मुंढे, शहर अध्यक्ष राकेश कासार, सचिव खेळू वाजे, सरचिटणीस संकेत नाकरेकर, उपाध्यक्ष महादेव आर्डे, गंगाराम भोरावकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष वैभव कदम, युवक शहर अध्यक्ष सुयोग बारटक्के पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्वांगिण विकासासाठी केलेले प्रयत्न, त्यांचे आचार, विचार, लोकाभिमुख धोरण तसेच केंद्राच्या विविध लोकोपयोगी योजना यांचा प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे, असे खा. धैर्यशिल पाटील यावेळी म्हणाले. स्वच्छ भारत कार्यक्रम केंद्राने हाती घेतल्यानंतर अनेक गावे स्वच्छ झालेली दिसत आहेत. गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी केंद्र शासनाने लोक कल्याणकारी योजना सुरू केल्या असून या योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून गाव, वस्ती वाडीवर अजून काही प्रश्न, समस्या असतील तर त्या जाणून घेवून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले. माझ्या खासदारकीच्या निधीसाठी तळा तालुक्याला झुकते माप देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. येथील खासदार आणि आमदार भारतीय जनता पार्टीमुळे निवडून आलेली आहेत. आपण केलेली कामे जर आपण लोकांपर्यंत पोचवू शकलो नाही तर लोकांना कळणार कसे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात घरोघरी जाऊन थेट संपर्क साधत भाजपाचे विकासाचे व्हिजननागरिकांना समजावून सांगावे या भागाचा कायापालट करण्याचा मानस आहे. महिला, युवक, खेळाडू आदींसाठी विकासाचे व्हिजन राबविण्याचा प्रयत्न करण्यातयेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रवी मुंढे, प्रशांत शिंदे, वैंकुठ पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले.
खा. धैर्यशील पाटील तळा तालुक्यात आल्याचे समजताच तळा तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी शहर प्रमुख राकेश वडके,जिल्हा कोअर कमिटी सदस्य लिलाधर खातु, नगरसेवक मंगेश पोळेकर, नरेश सुर्वे, माजी सरपंच नमित पांढरकामे, कैलास पायगुडे, गणेश ठिगळे, भाऊ ठिगळे, रघुनाथ वाघरे आदी मान्यवर उपस्थित होते.


































