पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ४- तालुक्यातील पोटनेर गावच्या हद्दीमध्ये मुंबई गोवा महामार्गावर एका अनोळखी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वा. च्या सुमारास अंदाजे वय ५५ ते ६० वर्षे व्यक्तीला कोणीतरी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने धडक मारल्याने अज्ञात इसमाचा मृत्यू झाला. माणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अनोळखी मयत इसमाचे नातेवाईकाबाबत व अज्ञात वाहना बाबत काही माहिती मिळवून आल्यास तात्काळ सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी नरेंद्र बेलदार माणगाव पोलीस ठाणे यांचा ९७६५७९२८२८ नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन माणगाव पोलिसांनी केले आहे.