पोलीस प्रवाह न्युज
माणगाव – दि. १४- पोलीस प्रवाह न्युज वर्धापन दिनाचे औचित्य साधून गोरेगाव पोलीस ठाणे येथे दिनांक १४ जून रोजी गोरेगाव लोणेरे प्रेस क्लब व पोलीस प्रवाह न्युज यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक नवनाथ कापले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गोरेगाव स. पो. नि. विजय सुर्वे यांच्या हस्ते संघर्षयोद्धा ह्या विशेषांकाचे प्रकाशन व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मान करण्यात आला.

या विशेष सत्कारामध्ये गोरेगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी विजय सुर्वे यांना देवदूत तसेच वूशू या खेळात महाराष्ट्र शासना तर्फे देण्यात येणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त कु. ऋषिकेश पुंडलिक मालोरे यांना खेलरत्न, माणगांव मधील अनेक गुन्ह्याचे गूढ उकळणारे माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गणेश समेळ व रुग्णसेवक संतोष खाडे यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पोलीस प्रवाह न्युज व गोरेगाव लोणेरे प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास विद्युत परिवेक्षक संजय गांधी गोरेगाव ग्रामपंचायत उपसरपंच चंद्रकांत गोरेगावकर, ॲड. पुंडलिक मालोरे, प्रेस क्लब व कोमसाप अध्यक्ष केदार खुळे, पोलीस प्रवाह न्युज वृत्त संपादक परेश शिंदे, स. फौ. संतोष माने, पो. शि. धोंडिबा गीते, पत्रकार गिरीश गोरेगावकर, मा. ता. प. से. संघ अध्यक्ष प्रमोद जाधव, ज्येष्ठ पत्रकार सुनील राजभर, सत्येंद्र सिंह, चेतन चव्हाण, वैभव सत्वे, नचिकेत म्हापसेकर, पीयूष भोसले, राजेंद्र खाडे, उपसरपंच मंगेश पवार, राज खाडे, विजय बक्कम यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे व दोन्ही टीमचे गोरेगाव स. पो. नि. विजय सुर्वे यांनी तोंडभरून कौतुक केले.




































