पोलीस प्रवाह न्युज
धुळे, दि. २१- शहरातील सामाजिक कार्यकर्ते असलेले जाकीर छोटू शाह यांची पोलीस बॉईज असोसिएशन धुळे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांनी जाहीर केले आहे.
पोलीसांबद्दल असलेली सहकार्याची भावना आणि तळमळ पाहून पोलीस बॉईज असोसिएशन धुळे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे यांनी सांगितले आहे.
जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी योग्य रीतीने पार पाडून धुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी / पोलीस कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवून त्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष जाकीर शाह यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यातील होमगार्ड जवान आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सुद्धा समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचेही जाकीर शाह यांनी सांगितले आहे.