पोलिस प्रवाह न्युज
माणगाव – दि. १५- तालुक्यातील इंदापूर विभागातील गौळवाडी येथील १२ वर्षे मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १२ मे रोजी ४ वा. च्या सुमारास कुमार शितल राम वाघमारे, वय १२ वर्ष १० महिने हिला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पलवून नेले. अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाची तक्रार माणगाव पोलीस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. नरेंद्र बेलदार करीत आहेत.




































