पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १४- पोलिस स्टेशन हद्दीत इंदापूर गावात बांगलादेशी विशेष विभागाने कारवाई करीत दोन घुसखोर बांगलादेशी नागरिकांना दि. १३ ऑगस्ट रोजी पकडले आहे.
सविस्तर असे की, मौजे इंदापूर येथील दळवी चाळीच्या जवळ घुसखोर बांगलादेशी नागरिक येणार असल्याबाबत गुप्त बातमी मिळाली असल्याने बांगलादेशी विशेष पथकाने ठिकाणी सदर ठिकाणी माजिदा बेगम मोहम्मद जहांगीर आलम, वय-३८, ग्राम- मेरेडिया भुईयापारा, पोस्ट ऑफिस- खिलगाव, राज्य- ढाका, देश- बांगलादेश, रसेल मोहम्मद फारूक हुसेन, वय – २९ रा. श्रीरामपूर, पो. झिकरगाछा, जिल्हा- जेशोर, देश – बांगलादेश यांना पकडले. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक आचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक वाघमोडे, स. फौ. ठाकूर, पो. ह. टेमकर, म. पो. ह. सुतार, पो. कॉ. म्हात्रे यांनी केली.
सदर व्यक्तींकडे कोणताही विजा व कोणतीही परवानगी न घेता मिळून आले असून त्यांना हद्दपार करणे करणेची पुढील कार्यवाही पोलिस विभाग करणार असल्याचे सांगितले.




































