पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव : दि, ८ – माणगावमध्ये सकाळी साडे अकरा ते पावणे बारा या दरम्यान माणगाव निजामपूर रोडवरील कोकण रेल्वे च्या ब्रिजवर एक २८ वर्षीय युवकाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माणगाव निजामपूर रोडवरील मालक प्रदीप मोरे यांचे हॉटेल “आपुलकी ” येथे वेटर म्हणून काम करणारा कामगार घनश्याम सिंह वय वर्षे २८ रा. नगरोरा, जिल्हा- श्रावस्ती, राज्य उत्तरप्रदेश व त्यांचा सहकारी हे कचेरी रोड परिसरातुन जाणाऱ्या रेल्वे ट्रॅक वरून निजामपूररोड येथे चालत येत असताना गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारी गाडी क्रमांक १२७१७ मंगला एक्सप्रेस या गाडीच्या धडकेत घनश्याम सिंह याचा मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिस ठाणे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. इ . काळे, पो. स. इ. राठोड यांच्यासह माणगाव चे कर्तव्यदक्ष पो. ह. रावसाहेब कोळेकर यांच्यासोबत पो, ह.राकेश सानप,पो. शी. रणवीर, पो शी. संतोष त्रिभुवन हे घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह शवविच्छेदना करिता माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. यावेळी रायगड पोलीस जीवनदूत पुरस्कार प्राप्त खांदाड चे युवा समाजसेवक भगवान महादेव पोवार, तसेच साईनगर चे युवा नेते संजोग कोळेकर यांनी या घटनेत पोलिस आणि प्रशासनाला महत्त्वपूर्ण सहकार्य केले. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाणे येथे या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.नि.निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करीत आहेत.




































