पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ४- रायगड जिल्ह्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या माणगाव नगरपंचायतवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे. यापूर्वीच्या उपनगराध्यक्षा हर्षदा सोंडकर (काळे) यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर दि. ४ डिसेंबर रोजी माणगाव नगरपंचायत दालनात उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका रिया रत्नाकर उभारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने रिया रत्नाकर उभारे यांची माणगाव नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या कार्यभारात पिठासीन अधिकारी माणगाव उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) संदीपान सानप यांच्यासह नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी यांनी काम पाहिले.
माणगाव नगरपंचायतमध्ये अनेक राजकीय स्थित्यंतरे घडल्यानंतर आजच्या मितिला नगरपंचायत मध्ये जनतेने निवडून दिलेले नगरसेवक एकूण १७ त्यापैकी १ शिवसेना शिंदे गट तर उर्वरित १५ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अप)चे व उबाठा १ आहेत. तर नामनिर्देशित (स्वीकृत) २ नगरसेवक हे देखील राष्ट्रवादी (अप) चे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अप) चे महाराष्ट्र राज्य प्रांत अध्यक्ष तथा रायगड रत्नागिरी चे खासदार सुनिल तटकरे यांनी अनेक राजकीय उलथापालथी नंतर माणगाव नगरपंचायत वर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

दि. ४ डिसेंबर रोजी माणगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी रिया रत्नाकर उभारे यांची बिनविरोध नियुक्ती झाल्यानंतर राष्ट्रवादी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांनी नगरपंचायत प्रांगणात फटाक्यांची आतषबाजी व जल्लोष केला. नगरपंचायतचे मुख्याधिकारी संतोष माळी व सर्व नगरसेवक यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष यांचे अभिनंदन केले. यावेळी माणगाव नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस गट नेते माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आनंद यादव, राष्ट्रवादी कोकण विभाग प्रवक्ते ॲड राजीव साबळे, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, नगरसेवक प्रशांत (आप्पा) साबळे, माजी नगराध्यक्ष योगिता चव्हाण, सभापती कपिल गायकवाड, माजी नगरसेविका भाग्यश्री यादव, माजी उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, दिलीप (बबडी) जाधव, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष संगीता बक्कम, उपाध्यक्ष श्रद्धा यादव, सोशल मीडिया अध्यक्ष किशोरी हिरवे, नगरसेविका ममता थोरे, नामनिर्देशित नगरसेवक शशिकांत मोहिते, विश्वजित जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस माणगाव तालुका अध्यक्ष बाळाराम (काका) नवगणे, रिया रत्नाकर उभारे यांचे मूळ गाव दाखणे येथून माजी सभापती कै.स्व: प्रभाकरदादा उभारे आणि उभारे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या ग्रामस्थानी विशेष उपस्थिती दाखवली. बहुसंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष रिया रत्नाकर उभारे यांचे अभिनंदन केले.
रिया रत्नाकर उभारे यांची माणगाव नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांची मिरवणूक माणगाव मुंबई गोवा हायवेवरून माणगाव नगरपंचायत कार्यालय ते हॉटेल आनंद भुवन ते त्यांचे निवासस्थान अंकुर कॉम्प्लेक्स पर्यंत जय बजरंग ढोल ताशा पथकाच्या ठेक्यावर काढण्यात आली. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष रिया रत्नाकर उभारे यांचे पती हे केवळ राजकीय विचारांचे नसून माणगाव शहरात त्यांचे सामजिक पार्श्वभूमी मोठी आहे. यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा असल्याने निजामपूर विभागातील शिवसेना नेते सुधीर पवार, राष्ट्रवादी नेते मिलिंद फोंडके यांच्यासह वेगवेगळ्या सामजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष रिया रत्नाकर उभारे यांना पुढील कार्यासाठी अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या आहेत.





































