पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ५- भारतात दरवर्षी ३ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय वकील दिन’ साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले राष्ट्रपती आणि ख्यातनाम वकील डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त देशभरातील बार असोसिएशन आणि कायदेशीर संस्था विविध कार्यक्रम, चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित करतात. दिनांक ३ डिसेंबर रोजी माणगाव बार असोशिएशन तर्फे माणगाव न्यायालयात वकील दिन साजरा करण्यात आला.
वकील दिनानिमित्त न्याय आणि कायद्याचे राज्य समाजात कायम राखण्यात वकिलांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले जाते. अनेक ठिकाणी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या कायदेशीर क्षेत्रातील योगदानाचे आणि मूल्यांचे स्मरण केले जाते. यावेळी माणगाव बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. मोहन मेथा, उपाध्यक्ष ॲड. पुंडलिक मालोरे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. प्रकाश ओक, ॲड. विनोद घायाळ, ॲड. सुशिल कांबळे, ॲड. निलेश रातवडकर, ॲड. योगेश आंबेतकर, ॲड. सुजित मेहता, ॲड. चेतन चव्हाण, ॲड. माणके, ॲड. मनोज गायकवाड, ॲड. संदिप जाधव, माणगाव बार असोशिएशन पदाधिकारी, सदस्य व वकील उपस्थित होते.




































