पोलीस प्रवाह न्यूज
माणगाव, दि १४ – मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गवर माणगाव तालुक्यातील मौजे कशेणे १४ सप्रोटेंबर रोजी संध्याकाळी ७.१५ वाजताचे सुमारास चालत्या मारुती इरटीकाने कारने घेतला पेट घेतल्याची घटना माणगाव पोलीस ठाणे हद्दीत घडली.
सविस्तर असे कि, मारुती ईरटीका कार क्रमांक MH.08.AX.8916 वरील चालक मुनाफ मोहम्मद मुकादम वय ५७ वर्षे राहणार, राजिवडा आदमपूर तालुका जिल्हा रत्नागिरी व सोबत ६ प्रवासी असे NH 66 ने मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास करत असताना, घटनास्थळी आलेवेळी अचानक इंजिन मधील वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन इंजिनमध्ये आग लागून गाडीने पेट घेतलेला आहे. परंतु प्रसंगसावधने कारमधील प्रवाशी व चालक सुखरूप बाहेर पडले.
सदर गाडीला लागलेली आग अग्निशमन दल माणगाव यांच्या मदतीने विझवण्यात आली आहे. घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी, कोणासही दुखापती झालेल्या नाहीत. मारुती ईरटीका कार रोडच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.