पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, २४ नोव्हेंबर- माणगाव शहरातील क्रिकेट खेळाडूंना स्पर्धात्मक युगात टिकता आले पाहिजे. युवा खेळाडूना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटचे नॉलेज मिळावे याकरिता स्थापन माणगाव शहर क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट च्या महासंग्रामाला दि. २३ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे. हे सामने २३ नोव्हेंबर रोजी जुने माणगाव शासकीय विश्रामगृहासमोरील हेलिपॅड मैदानावर खेळविण्यात आले. माणगाव शहर क्रिकेट असोसिएशन चे हे यावर्षी ९ वे पर्व आहे.या सामन्यांचे नियोजन व व्यवस्थापन छत्रपती ग्रुप माणगाव व तीनबत्ती नाका जुने माणगावच्या सर्व सदस्यांनी केले.
या सामन्यांना शिवसेनेचे युवा नेते डॉ. परेश (अमेय) उभारे यांनी भेट दिली असताना कै. अशोक भिकु सोनार यांच्या सौजन्याने व शिवसेना शहर संघटक अनिल सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या सामन्यांच्या नियोजन आणि व्यवस्थापनात छत्रपती ग्रुप माणगाव व तीनबत्ती नाका जुने माणगावचे सदस्य व खेळाडू विजय सोनार, शक्ति सोनार, आदेश सोनार, प्रतीक सोनार, दिपक सोनार, ऋषिकेश सोनार, मनोज सोनार, भूषण देसाई, कैलास तळकर, उमेश तळकर, आकाश शिंदे, रिझवान चरफरे, आयुष तळकर. ओमकार तळकर, आर्यन जुमारे, भूषण तळकर, मुकुल मेहता, मन्नानं पालेकर व सर्व क्रिकेट प्रेमी छत्रपती ग्रुप माणगाव व तीनबत्ती नाका जुने माणगाव यांच्या सदस्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
या सामन्यामध्ये एकूण ११ संघ खेळविण्यात आले. त्यामध्ये दत्तनगर संघाने प्रथम क्रमांक, माणगाव पोलीस ठाणे संघाने द्वितीय क्रमांक व साईनगर संघाने तृतीय क्रमांक असे क्रमांक व पारितोषिक पटकावले आहेत.




































