पोलीस प्रवाह न्युज
मुंबई, दि. १७- मुंबईत आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची घोषणा जवळ येत असल्याने, शहरातील राजकीय वातावरणाला वेग आला आहे. विविध पक्षांच्या हालचाली, उमेदवारांच्या चर्चांमध्ये वाढ आणि स्थानिक पातळीवरील सक्रियता यामुळे राजधानीत उत्सुकता निर्माण झाली आहे. या घडामोडींच्या केंद्रस्थानी म्हणून ओळखला जाणारा लालबाग–परळ परिसरही याला अपवाद नाही. इथल्या प्रभागांवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
लालबाग–परळ परिसरातील प्रभाग क्र. 204 संदर्भात स्थानिकांमध्ये चर्चेत असलेले नाव म्हणजे किरण तावडे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गेल्या 8 वर्षांपासून शाखाप्रमुख, तसेच 10 वर्षांपासून मुंबईचा राजा गणपती मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.
कोविड काळातील अन्नवाटप, आवश्यक साहित्य पुरवठा, तसेच जवळील सरकारी रुग्णालयांतील गरजू रुग्णांना दिलेली मदत यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याची विशेष नोंद झाली. त्याचबरोबर, स्थानिक युवकांना महाविद्यालयीन प्रवेश मिळवून देणे आणि गरजूंना रोजगार उपलब्ध करून देणे यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्नही परिसरात कौतुकास्पद मानले जातात. त्यामुळे ते घराघरांत परिचित नाव झाले असून युवकांमध्ये त्यांची लोकप्रियता लक्षणीय आहे.
स्थानिकांच्या मते, मागील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या भागात पक्षाला अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने नवीन, सक्रिय आणि स्थानिक नेतृत्वाची गरज वारंवार व्यक्त केली जात आहे. तसेच प्रभाग क्र. 204 हा सर्वसाधारण (Open) श्रेणीतील असल्यामुळे, किरण तावडे यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत पक्षात आणि स्थानिकांमध्ये चर्चा वाढल्याचे काही नागरिक सांगतात.


































