पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २२- मागील काही दिवसांपूर्वी माणगाव तालुका भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आणि युवा मोर्चा जिल्हा चिटणीस मोर्बा पवारवाडी येथील युवा कार्यकर्ते राकेश गुलाबराव पवार यांनी ना. भरत गोगावले यांच्या विकासकामांवर प्रेरित होऊन विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. मोर्बा विभागात ना.भरत गोगावले यांचे हात बळकट करण्याचे व्रत उचलले आहे. राकेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्बा विभागात शिवसेना पक्ष प्रवेशाचा झंझावात सुरू आहे.
मोर्बा विभागात येणाऱ्या देगाव येथील सुहास तानाजी गायकवाड व बोर्ले बौद्धवाडीतील संकेत संजय तांबे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २२ नोव्हेंबर रोजी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी माणगाव तालुका प्रमुख ॲड. महेंद्र मानकर, ॲड. अनंत जाधव, प्रवीण पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राकेश पवार यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशानंतर मोर्बा विभागात शिवसेना पक्षाला बळकटी मिळाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विविध पक्षाचे कार्यकर्ते शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत. या पक्ष प्रवेशाचा आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेला चांगलाच फायदा होणार आहे.




































