पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १६- मागील काही दिवसांपूर्वी पूर्वाश्रमीचे माणगाव तालुका भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आणि युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस मोर्बा पवारवाडी येथील युवा कार्यकर्ते राकेश गुलाबराव पवार यांनी ना. भरत गोगावले यांच्या विकासकामांवर प्रेरित होऊन विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आणि. मुस्लिम बहुल मोर्बा विभागात ना. भरत गोगावले यांचे हात बळकट करण्याचे व्रत उचलले आहे. यामुळे राकेश पवार यांचा मोर्बा विभागात शिवसेना पक्ष प्रवेशाचा झंझावात सुरू आहे.अशी चर्चा माणगाव तालुक्यात जोरदार सुरू आहे.
मोर्बा विभागात येणाऱ्या दहिवलीकोंड पालकरवाडी येथील राष्ट्रवादी आणि भाजपा पक्षातील कार्यकर्त्यांनी नामदार मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत दि. १५ नोव्हेंबर रोजी उमरोली खेमबाबा मंदिर पटांगणात जाहीर पक्ष प्रवेश केला.
या पक्ष प्रवेशात अतिफ टाके, साहिल सतवे,हेमंत पालकर, बासित बंदरकर, हुजेब टाके, रमेश कोळी, संदेश मांडवकर,अमाद बंदरकर, सोहम जाधव ओमकार जाधव, राजबा जाधव इत्यादिनी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेशावेळी ना. गोगावले यांच्या समवेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, तालुकाप्रमुख ॲड महेंद्र मानकर, युवा नेते डॉ अमेय (परेश) उभारे, माणगाव शहर प्रमुख नितीन दसवते , शहर संपर्क प्रमुख ॲड प्रसाद धारिया, युवासेना तालुका सचिव जितेंद्र तेटगुरे, युवानेते नंदुराज वाढवळ, व माणगाव तालुक्यातील शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी शिवसैनिक आदी उपस्थित होते. यावेळी नवीन पक्ष प्रवेशकर्त्यांनी आम्ही शिवसेना पक्ष मोर्बा विभागात वाढवू आणि मजबूत करू अशी भूमिका घेतली असल्याचे मत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.





































