पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १५- इंस्टाग्राम सोशल मिडिया ॲपवर मैत्री झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार झाल्याची घटना इंदापूर येथे घडली असून माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि.१ जून २०२४ ते दि. ९ सप्टेंबर २०२५ दरम्यान महिला फिर्यादी व आरोपी यांची इंस्टाग्रामवर मैञी झाली. त्यानंतर आरोपी याने फिर्यादी यांना लग्नाचे अमिष दाखवुन फिर्यादी हिचे इच्छे विरुध शारीरीक संबध ठेवले व शारीरीक संबधाचे व्हिडीओ आरोपी याने त्याचे मोबाईलमध्ये रेकॉर्डींग केले. आरोपी याचे इतर ठिकाणी असलेल्या आफेयर बाबत फिर्यादी हिस समजल्याने फिर्यादीने आरोपी यास माझे सोबत संबंध ठेवु नकोस असे सांगीतले असता त्या गोष्टीचा आरोपी यास राग येवून त्याने फिर्यादी हिचेसोबत शारिरीक संबंध ठेवण्याचे व्हिडीओ फिर्यादी हिची मैत्रीन हिला व्हॅट्सअप स्टेट्स वरती ठेवले. आरोपी याने फिर्यादी हिची आई, बहिण व चुलते यांना देखील शिवीगाळी केली व फिर्यादी हिचे सोबत शारिरीक संबंध ठेवल्याचे काढलेले व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याबाबत माणगाव पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो. नि. निवृत्ती बो-हाडे हे करीत आहेत.