पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ७- तालुक्यातील लोणेरे गोरेगाव विभागातील न्हावे गावातील एका ११ वर्षीय मुलाचा क्रिकेट मैदानाशेजारी असलेल्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, न्हावे गावातील स्वरूप शैलेश अंधेरे, वय वर्ष ११, हा दि. ६ जुलै रोजी सायंकाळी ५:१५ वाजण्याच्या सुमारास गावातील क्रिकेट मैदानावर खेळण्याकरिता गेला असता तो खेळत असताना तेथे असलेल्या पाण्याने भरलेल्या डोहाजवळ गेला असता त्याचा पाय घसरून त्याचा तोल जाऊन त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
या घटनेची नोंद गोरेगाव पोलीस ठाणे येथे अ. मृत्यू. रजि. नं.१६/२०२५. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हि . बी. सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. आर पी धोत्रे हे करीत आहेत.




































