पोलीस प्रवाह न्युज
रायगड – दि. २३- रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची प्रशासकीय बदली झाली असून आंचल दलाल यांची रायगडच्या नव्या पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सोमनाथ घार्गे यांनी आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात पोलीस दलाच्या अधुनिकीकरणावर मोठा भर दिला. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना स्मार्ट पोलीस ठाणे बनवण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले. पोलीसांना अत्याधुनिक वाहने उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्न केले. शिस्तप्रीय आणि मितभाशी अधिकारी म्हणून ते ओळखले गेले. त्यांच्या कार्यकाळात सिसीटीएनएस प्रणाली रायगड पोलीसांच्या कामगिरी सातत्याने अव्वल राहिली. प्रशासकीय कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.

आंचल दलाल या रायगडच्या नव्या पोलीस अधीक्षक असणार आहेत. पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक म्हणून त्या कार्यरत होत्या. त्या रायगड पोलीस दलाची नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी असणार आहेत. त्या २०१८ सालच्या भारतील पोलीस सेवेतील अधिकारी आहे. त्यांनी यापुर्वी सातारा जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.

































