पोलिस प्रवाह न्युज
माणगाव – दि. ७– पहलगाममध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली होती. दहशतवाद्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याची मागणी संपूर्ण देशभरातून जोर धरू लागली होती. दि. ७ मे च्या मध्यरात्री केंद्र शासनाने व भारतीय सैन्याने पाकिस्तान मधील ९ जागांवर हल्ला करीत दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त केले. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. ऑपरेशन सिंदूर नंतर भाजप युवा मोर्चा तर्फे दि. ७ मे रोजी माणगावमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाके फोडून आणि पेढे वाटून केला आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणांबरोबर भारताचा जयघोष करून सेनादलाचा देखील केला जयजयकार करण्यात आला. यावेळी भाजपा युवक जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, शिवसेना शहर प्रमुख प्रसाद धारिया, भाजपा प्रदेश चिटणीस यशोधरा गोडबोले, सामाजिक कार्यकर्ते विक्रांत गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस युवानेते सिद्धांत देसाई, सारिका मेहता, दिक्षा देसाई,युवा मोर्चा सरचिटणीस अमोल पवार, भाजप तालुकाध्यक्ष परेश सांगले माजी उपसरपंच स्वप्नील सकपाळ, उमेश यादव, भाजपा तालुका उपाध्यक्ष महादेव कदम, सुरज कडू, ओमकार गायकवाड, समीर पवार, अनिकेत साळुंखे, किशोर झेमसे, मिलिंद शेलार व माणगांवकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे म्हणाले की, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा संपूर्ण देशात निषेध करून दहशतवाद्यांना योग्य शासन झाले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर मध्यरात्री केंद्र शासन व भारतीय सैन्यांनी एअर स्ट्राईक करून चोख व तडाखेबाज प्रत्युत्तर पाकड्यांना दिले आहे. पाकडे म्हणजे कुत्र्याची वाकडी शेपूट आहेत. त्यामुळे शेवटचा दहशतवादी नष्ट झाल्याशिवाय ही कारवाई थांबू नये, अशी मागणी यावेळी थोरे यांनी केली.




































