पोलीस प्रवाह न्युज
महाड, दि. २४- तालुक्यातील विन्हेरे करंजाडी विभागातील नाभिक समाज चळवळीतील कार्यकर्ते आणि विभागाचे माजी सचिव संतोष दगडू जाधव यांचे वडील दगडू गणपत जाधव यांचे दि. २२ सप्टेंबर रोजी वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांचे दशक्रिया विधी बुधवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी तर उत्तरकार्य शनिवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी त्यांचे राहते घरी करंजाडी वाणीकोंड महाड येथे होतील.
गावातील आणि समाजात सर्व कार्यात समरस होऊन सर्वांशी मिळून मिसळून राहणारे, आणि सर्वांशी प्रेमाची आणि आदराची वागणूक देणारे कै. दगडू गणपत जाधव यांच्या जाण्याने जाधव कुटुंब आणि आप्तेष्ट परिवारावर शोककळा पसरली आहे. कै. दगडू गणपत जाधव यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, जावई, सुन नातवंडे असा परिवार आहे.


































