पोलीस प्रवाह न्युज
माणगाव – दि. १०- सेवा सहयोग फाउंडेशन आणि महानगर गॅस यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरी विकास प्रकल्पा अंतर्गत माणगावमधील विविध गावांमध्ये किशोरी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये माणगाव तालुक्यातील इंदापूर विभागातील कालवण येथे ‘अश्विनी किशोरी वर्गाचे’ उद्घाटन किशोरवयीन मुली त्यांचे पालक आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.
सेवा सहयोग फाउंडेशन तर्फे किशोरवयीन मुलींना आरोग्य विषयक माहिती, स्वच्छता विषयक माहिती आणि स्वसंरक्षणाचे धडे जसे लाठीकाठी प्रशिक्षण दिले जाते. कालवण येथील अश्विनी किशोरी वर्गाचे उद्घाटन दि. १० जून रोजी प्राथमिक शाळा कालवण येथे उत्साहात पार पडले. यावेळी माणगाव समन्वयक अश्विनी गणेश समेळ, किशोरी वर्ग प्रमुख मनस्वी कालवणकर, किशोरवयीन मुली त्यांचे पालक आणि ग्रामस्थ तसेच रणजीत हर्णेकर, वैभवी हर्णेकर, नियती धाडवे, संजना वाढवळ, जान्हवी हर्णेकर, बनीता वालगुडे, अनीता डिघे, सुजिता पाराप्ते, दर्शना पळसमकर आदी मान्यवर उपस्थित होते. सेवा सहयोग फाउंडेशन संचालक किशोर मोघे, किशोरी विकास प्रकल्प प्रमुख आरती नेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली किशोरी वर्गाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.




































