पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि.२९- रायगड जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातील “भाताचे कोठार”म्हणून प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे. यावेळी मान्सून हंगामानंतर देखील रायगड जिल्ह्यात सर्व तालुक्यात दररोज अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसासोबत वादळी वारे यामुळे जिल्ह्यासह माणगाव तालुक्यातील भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. भात पिके झोपली असून आता त्यांना अंकुर फुटण्याची वेळ आली आहे. यामुळे माणगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या सर्व अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी माणगाव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख प्रभाकर ढेपे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून दि. २९ ऑक्टोबर रोजी माणगाव तहसीलदार दशरथ काळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी माणगाव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख प्रभाकर ढेपे यांच्या समवेत माणगाव नगरपंचायत मा. सभापती तथा विद्यमान नगरसेवक अजित तार्लेकर, द. रायगड जिल्हा समन्वयक चंद्रकांत यादव, शिवाजी गावडे, युवासेना माणगाव शहरप्रमुख अजिंकेश जाधव, माणगाव शाखाधिकारी हार्दिक काते, मधुकर नाडकर, महिला तालुका प्रमुख योगिता मोरे, माणगाव शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे कट्टर युवा शिवसैनिक इब्राहिम करेल, साहिल गायकवाड, सचिन खिडबीडे, विजय मेस्त्री, किसन घोले, चंद्रकांत पवार, विजय सावंत, विजय चितळेकर, निलेश शिंदे, विलास म्हसकर, नारायण पांचाळ आदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर व कडवे शिवसैनिक उपस्थित होते.
या निवेदनात अवकाळी पावसामुळे माणगाव तालुक्यातील एकपिकी आणि केवळ भातशेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रान डुकरे आणि अन्य जंगली जनावरे यांच्यामुळे या पडलेल्या भातपिकांचे नुकसान होत आहे. त्यांचे प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक मदत द्यावी असा आशय नमूद करण्यात आला आहे. याबाबत राज्य व केंद्र शासनाने तातडीने काही ठोस निर्णय न घेतल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा सूचक इशारा यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.



































