पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ५- तालुक्यातील निजामपूर विभागातील जिते ग्रामपंचायत हद्दीतील उंबर्डी गावच्या हद्दीत एक ११ वर्षीय मुलीचा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उंबर्डी येथील आपल्या आजीकडे राहणारी अश्विनी गेनू ढेबे, वय वर्षे ११, मूळ गाव गडले दूधवान ता. मुळशी, पुणे ही सायंकाळी ४: ३० वाजण्याच्या सुमारास आपल्या आजी सोबत गुरे आणण्यासाठी उंबर्डी गावच्या हद्दीतील काळ नदीचे पात्र ओलांडून जात असताना, पावसाचा जोर अचानक वाढल्याने, पाण्याचा प्रवाह वाढल्याने या पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन मयत मुलगी ही बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिला पुढील उपचाराकरिता माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
या घटनेप्रकरणी माणगाव पोलिस ठाणे येथे ४८/२०२५. भा. ना. सु. सं.२०२३ चे कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून पुढील तपास माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स. इ. जाधव करत आहेत.




































