पोलीस प्रवाह न्युज
धाराशिव, दि. २६- महाराष्ट्र पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय तसेच सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय / कारागृह पोलीस / लोहमार्ग पोलीस { जेल पोलीस } या सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी दिनांक 04 / 11 / 2025 वार मंगळवार रोजी सकाळी ठीक 10 ते सायंकाळी 06 वाजे पर्यंत आझाद मैदान मुंबई येथे एकदिवसीय भव्य आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रमोद तानाजी वाघमारे हे करणार असून महाराष्ट्रातील पोलीस कुटुंबीयांनी तसेच सेवानिवृत्त पोलीसांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्याच प्रमाणे कारागृह पोलीस { जेल पोलीस } ,व लोहमार्ग पोलीस { रेल्वे पोलीस } यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या
1 } पोलीस भरती मधे पोलीसांच्या पाल्यांना एकूण 10 % आरक्षण देण्यात यावे तसेच याचा फायदा चालू पोलीस सेवेत कार्यरत असणाऱ्या पोलीस पाल्यांना सुद्धा देण्यात यावा !
2 } सन 2023 पासून प्रलंबित असलेले DG लोन तत्काळ वाटप करण्यात यावे !
3 } सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच त्यांची पत्नी यांच्या
सर्व आजारांवर मोफत उपचार करण्यात यावे !
4 } सन 2001 पूर्वी पासून पोलीस सेवेत असताना पोलीस कर्मचारी यांच्या अनुकंप पाल्यांसाठी 03 अपत्यची अट रद्द करण्यात यावी !
05 } महाराष्ट्र कारागृह विभागात { जेल पोलीस } कार्यरत असणाऱ्या पोलीस पाल्यांना सुद्धा पोलीस भरती मधे पोलीस पाल्य आरक्षणाचा लाभ देण्यात यावा !
6 } पोलीसांच्या पाल्यांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी शहीद तुकाराम ओंबळे साहेबांच्या नावाने महामंडळ स्थापन करण्यात यावे !
7 } लोहमार्ग पोलीसांना { रेल्वे पोलीस } रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी कुटुंबासह पास देण्यात यावा तसेच महिला पोलीस आणि पुरुष पोलीस यांच्यासाठी सर्व रेल्वे स्टेशन वरती चेंजिग रूम ची व्यवस्था करण्यात यावी !
8 } सन 2005 नंतर पोलीस भरती झालेल्या पोलीसांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी !
9 } पोलीस खात्यातील 10 , 20 , 30 चा फायदा संपूर्ण पोलीस दलातील अंमलदार यांना देण्यात यावा !


































