पोलीस प्रवाह न्युज
सिध्दनेर्ली, दि. २७- पुरोगामी विचारांचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातही शाहूंचे विचार जपताना आणि ते आचरणात आणताना आपण कुठेतरी कमी पडत आहोत. अशा भयावह परिस्थितीतही डाव्या चळवळीतील ध्येयवेडी माणसं आपल्या कृतीतून शाहूंचे विचार चिरकाल टिकवत आहेत.त्यामुळे चळवळीतील कार्यकर्ते, शेतकरी कष्टकरी हेच शाहू महाराजांचे खरे वारसदार आहेत. असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते भिकाजी मगदूम-बामणीकर यांनी केले
सिध्दनेर्ली ता कागल येथील लाल बावटा कार्यालय, कामगार भवन येथे, छञपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू महाराज यांच्या विचारांची गरज या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काँ. बबन बारदेस्कर होते.
यावेळी बोलताना भिकाजी मगदूम पुढे म्हणाले, शाहू महाराजांनी केवळ सामाजिक सुधारणा केल्या नाहीत, तर शेतकऱ्यांच्या हितासाठीही अनेक योजना राबवल्या. जलसंधारण, सहकारी चळवळ आणि कृषी विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. समानता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये त्यांनी जोपासली असल्याने सर्व सामान्य दिन दुबळ्या समाजाला न्याय देण्याचेही कार्यही शाहुनी केल्याचे मतही व्यक्त केले.

मधुकर सुतार (भडगाव) , अमर पाटील (बानगे), विजय कुरणे (सिद्धनेर्ली), तानाजी मगदूम (बामणी) उज्वला पाटील (आशा व गटप्रवर्तक संघटना ) यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉ राजाराम आरडे,अजित मगदूम, संदिप सुतार, शिवाजी मोरे, संतोष राठोड, मोहन गिरी, दिनकर जाधव, विनायक सुतार, शोभा आगळे यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे स्वागत कॉ प्रकाश कुंभार यांनी केले. प्रास्ताविक कॉ शिवाजी मगदूम यांनी तर आभार कॉ. विक्रम खतकर यांनी मानले.




































