पोलीस प्रवाह न्युज
सोलापूर, दि. ३०- सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील मौजे गौंडरे येथील विजय चंद्रकांत खंडागळे यांना तेलंगणा राज्याच्या वतीने राष्ट्रीय पुरस्काराने दिनांक ३० नोव्हेंबर रोजी हैद्राबाद येथे गौरविण्यात आले.
खंडागळे यांना बालवयापासून निसर्ग, संगित, साहित्य, स्वलिखीत कवीता, भजन किर्तनाद्वारे समाजात सुखा दुःखाच्या कार्याच्या निमित्ताने जनजागृती केली. भारतीय वृक्षांची जवळ जवळ ४० हजार वृक्षांची लागवड व त्यांचे संरक्षण पर अनेक उपक्रम त्यांनी राबविले. गटशेती, निसर्ग शेती द्वारे शेतकर्यांना एकत्र आणणे, मराठी शाळा जनजागृती, अंद्धश्रद्धा निर्मुलन, बेटी बचाव जनजागृती, देशी पशु पक्षी संवर्धन, गोमाता बचाव कार्यक्रम इ . विषय घेवून सामाजिक कार्य संपूर्ण देशभरात केले आहे. मराठी साहित्य, संगीत, पर्यावरण संवर्धन काळाची गरज अशा अनेक विषय. घेऊन समाजात अनमोल कार्य केल्याबद्दल काव्यरत्न राष्ट्रीय पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.





































