पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २६- स्टेट बँक ऑफ इंडिया माणगाव शाखेतर्फे दि. २७ जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते. राज्यातील विविध रूग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेंढींमधील साठा कमी पडू लागला आहे. हीच गरज लक्षात स्टेट बँक ऑफ इंडिया माणगाव शाखा यांनी ‘रक्तदान’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २७ जून रोजी सकाळी ठिक १० ते ४ वा. या वेळेत स्टेट बँक ऑफ इंडिया माणगांव शाखा येथे रक्तदान शिबिर होणार आहे.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये रक्तदानाविषयी असलेले गैरसमज दूर व्हावेत व त्याचे महत्व लोकांना समजावे हा या शिबिराचा उद्देश आहे. या शिबिरासाठी माणगाव सर्वसामान्य नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दयावा असे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे करण्यात आले आहे.




































