पोलीस प्रवाह न्युज
मंडणगड, दि. २८- तालुक्यातील लाटवण पिंपळगावचे रहिवाशी वसंत केशव सुतार यांची महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार संघ संलग्न भारतीय मजदुर संघ यांच्या असंघटित कामगार संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मागील पाच वर्षे भारतीय जनता पार्टीचे “विस्तारक” म्हणून महाड, उरण, कल्याण ग्रामीण व बेलापूर मतदारसंघात काम केलं आहे.तसेच केंद्रशासन व राज्यशासनाच्या कल्याणकारी योजना रायगड,रत्नागिरी,ठाणे व.मुंबई येथे राबवण्याचे काम सध्या ते करत आहेत.
मंडणगड तालुक्यातील लाटवण पंचक्रोशीत शेतकरी सन्मान योजना, आयुष्यमान भारत कार्ड, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शासनाच्या कृषी संलग्न योजनांच्या नोंदणी, बांधकाम कामगार योजना नोंदणी अशा योजनांचा लाभ वसंत सुतार यांनी अनेक लाभार्थीना मिळवून दिलेला आहे. भविष्यात असंघटित कामगार व घरेलु कामगार यांना शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त देण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी नोंदणी शिबिर घेऊन त्याची नोंदणी केली जाईल व प्रत्येक पात्र लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळेल अशी ग्वाही वसंत सुतार यांनी दिली आहे. वसंत सुतार यांच्या यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे कोकण विभाग तसेच राज्यातील विविध विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.



































