- पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २१- आयुष मंत्रालय भारत सरकार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत माणगाव तालुका प्रशासन, तालुका क्रीडा अधिकारी व मनयोग मंदिर माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माणगाव तहसील कार्यालय याठिकाणी शनिवार दि. २१ जून रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय योगादिन उत्साहात साजरा करण्यात आला. या योगा दिनात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योगा करून मनमुराद आनंद लुटला.

यावेळी मार्गदर्शन करताना ना.आदिती तटकरे यांनी शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी योगाची नित्तांत आवश्यकता असल्याचे सांगितले. योगा शिक्षिका मनीषा राजपूत यांनी योगा दिनाची माहिती देऊन आजच्या धगधगीच्या जीवनात आपले आरोग्य निरोगी व सुदृढ राहावे याकरिता प्राणायाम, वज्रासन, ताडासन, भुजंगासन अशी विविध योगाचे प्रकार सांगून आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत योगाचे प्रात्यक्षिक करून सहभागी झालेल्या सर्वानी योगा केला. या आंतरराष्ट्रीय योगा दिनात ना. आदिती तटकरे, माणगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.संदिपान सानप, उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, तहसीलदार दशरथ काळे, मुख्याधिकारी संतोष माळी,पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, केंद्र प्रमुख शंकर शिंदे उपस्थित होते.




































