पोलीस प्रवाह न्यूज
गोरेगाव- दि. ६- गोरेगाव येथे ११ वी २००९ बॅचची गुरुजन ऋणानुबंध सोहळा संकल्पना असलेल्या बहुचर्चित असा कार्यक्रम रविवार दिनांक ४ मे २०२५ रोजी राजा भाऊ मोने ज्युनिअर कॉलेज गोरेगाव व इयत्ता ११ वी २००९ आणि २०१० यांच्या संयुक्त विद्यमानाने गोरेगाव येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. ११ वी १२ वी असलेले गुरुजन शिक्षकेत कर्मचारी आणि शालेय संस्था विश्वस्त यांची उपस्थिती गुरुजन ऋणानुबंध सोहळ्याचे व या बॅच मधील विद्यार्थी एकत्र आल्याने हा गुरुजन ऋणानुबंध कार्यक्रम चांगलाच रंगला. या सोहळ्यामध्ये मा.श्री. खटके सर, मा.श्री. कांबळे सर, श्री. देशपांडे सर, सौ.हासे मॅडम, मा.श्री.जमदाडे सर हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षणाचे केंद्र ठरले.
गुरुजन ऋणानुबंध सोहळा संपन्न होण्यामागे प्रमुख भूमिका शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. शहा सर यांचे योगदान अतुलनीय होते.गेल्या १५ वर्षापासून जे क्षण फक्त आठवणीतच होते ते क्षण परत भेटल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्यस्मित दिसून येत होतं.
या बॅच मधील दिनेश शिरगावकर, सायली विचारे, अनिकेत महाडिक, जयेश लोखंडे, भास्कर महादे, तेजस बिरवाडकर यांच्या नियोजनातून आकार दिलेल्या या सोहळ्याच्या अप्रतिम संपन्न झाले. सर्व विश्वस्त गुरुजन वर्ग यांना २००९ आणि २०१० च्या वतीने सन्मानचिन्ह शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. गुरुजन वर्गाच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून दीप प्रज्वलित करून घेतले. त्यानंतर उपस्थित शिक्षक वर्ग यांनी मार्गदर्शन दिले. जुन्या आठवणींना ताज्या केल्या. त्यानंतर २००९ बॅचच्या सगळ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी गीता शिंदे रचलेल्या कविताने कार्यक्रमाचं वातावरण प्रसन्न झालं. गुरुजन ऋणानुबंध सोहळ्याच्या आभार प्रदर्शन २००९ बॅचे ची स्नेहा साळवी हिने केले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन छान प्रकारे पार पडला. शाळेचे आणि गुरुजनांचे आपुलकी जिव्हाळा जपण्याचा संदेश देणाऱ्या या सोहळ्याचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे. या कार्यक्रमाची प्रस्तावना योगेश ढेपे आणि नितीन शिंदे यांनी केली तर सूत्रसंचलन आल्केश शिंदे यांनी केले.




































