पोलीस प्रवाह न्युज
करमाळा- दि. ३१- करमाळा पोलिसांनी दमदार कामगिरी करीत १ लाख ५० हजार २०० रुपये किमतीचे सुमारे ६ किलो गांजा जप्त केला आहे. गोपणीयरित्या मिळालेले बातमीप्रमाणे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी ही कारवाई केली आहे.
करमाळा पोलीस स्टेशन कडील पोहवा पांडूरंग तुकाराम आरकिले यांना गोपणीय खबर मिळाली की, मौजे जेऊर, ता. करमाळा येथे एक इसम गांजा विक्रीकरीता घेवुन येणार आहे अशी विश्वसनीय माहीती प्राप्त झाली होती. त्याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी छापा कारवाईची परवानगीचे अधिकारपत्र प्राप्त करून घेवून छापा कारवाई करीता संपुर्ण सिल साहीत्य, शासकीय पितळी सिल, कार्बन व इलेक्ट्रॉनिक वजन काटा, लॅपटॉप, प्रिन्टर, बॅटरीसह पो. नि. रणजीत माने, सहा.पो.नि. श्री. पोपट टिळेकर, पोहवा /१५० लोहार, पोहवा / ३७५ आरकिले, पोहवा /१३६ शेख, पोहवा /१२४ ढेंबरे, पोना /१२९९ गोरे, पो. अंमलदार १६७ दहिहांडे, चापोशि/ ११९८ बारकुंड दोन पंच, वजनकाटाधारक, असे सरकारी वाहन व खाजगी वाहनाने छापा कारवाई करीता रवाना झाले.
दिनांक ३० मे रोजी ०.५० ते ०१.२० चे सुमारास मौजे जेऊर, ता. करमाळा येथे सापळा रचून त्यांना मिळालेले खबरीप्रमाणे एक इसम पांढऱ्या रंगाची बॅग घेवून जेऊर टेंभुर्णी बायपास रोड, जय मोटार गॅरेज जवळ जेऊर, ता. करमाळा येथे जेऊरच्या दिशने चालत जात असताना दिसला. त्याचा आम्हास मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आला. त्वरीत पोलीस पथकाचे मदतीने सदर इसमास घेराव टाकुन पो. नि. रणजीत माने यांनी त्यास त्यांची, सोबतचे पंच व पोलीस पथकाची ओळख करून देवुन आपले ओळखपत्र दाखवुन पोलीस असल्याचा परिचय दिला. सदर इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव महादेव बाबुराव फाळके वय ६८ वर्षे, रा. गोविंद बापु नगर, जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापुर असे सांगीतले.
नमुद इसमांची अंगझडती व त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या बॅगची झडती घेतली असता, त्यामध्ये दोन प्लास्टिकच्या पिशव्या मिळून आल्या व त्यात १,५०,२००/- रुपये किंमतीचा हिरव्या रंगाची पाने, फुले, काडया, बिया असलेला असा एकूण ०६ किलो ०८ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. तो पंचाच्या समक्ष पोनि श्री. रणजीत माने यांनी जप्त करून इसम नामे महादेव बाबुराव फाळके वय ६८ वर्षे, रा. गोविंद बापु नगर, जेऊर, ता. करमाळा, जि. सोलापुर यास गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेवून त्याच्या विरुध्द पोहवा / ३७५ पांडूरंग आरकिले यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (पप) (ब) प्रमाणे गुन्हा नोंद करून सदर गुन्हयाचा तपास सहा. पो.नि. श्री. पोपट टिळेकर यांना देण्यात आलेला आहे. त्यांनी गुन्हयातील आरोपी महादेव बाबुराव फाळके यास लागलीच अटक करून मा. कोर्टात हजर केले असता, त्यास मा. न्यायालयाने दिनांक २ जून रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी साो. सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधिक्षक साो. श्री. प्रितम यावलकर, सोलापूर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील साो., करमाळा उपविभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि./ रणजीत माने, स.पो. नि./ पोपट टिळेकर, पोहवा /१५० लोहार, पोहवा / ३७५ आरकिले, पोहवा /१३६ शेख, पोहवा /१२४ ढेंबरे, पोना/१२९९ गोरे, पो.शि.क्र १६७/ दहिहांडे, चापो.शि.क्र ११९८ बारकुंड यांनी केली आहे.



































