पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १४- तालुक्यातून जाणाऱ्या पुणे दिघी महामार्गावर एस टी बस चा अपघात होऊन ३ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दिनांक १४ जुलै रोजी माणगाव आगारातून सकाळी ९:३० वाजता सुटणारी एस टी बस माणगाव जामखेड बस क्रमांक एम एच १३ सी यू ६९३७ ही दिघी पुणे मार्गावरून जात असताना निजामपूर विभागातील कोस्ते बुद्रुक गावच्या हद्दीत सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पलटी झाली. या बसमध्ये २९ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात दत्तू काशीराम सुतार वय वर्षे ८६ रा. कोस्ते खुर्द, बाबू मारुती शिंदे वय वर्ष ७०, विलास सुखदेव जाधव वय वर्षे ७२ हे तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या अपघाताची नोंद माणगाव पोलिस ठाणे येथे करण्यात आली असून पुढील तपास माणगाव पोलिस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस करीत आहेत.




































