पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. ९- मुंबई गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण माणगाव तालुका आहे. या माणगाव तालुक्याला विविध ऐतिहासिक, कला, सांस्कृतिक, क्रीडा इतिहासचा वारसा लाभला आहे. माणगाव शहरात प्रथमच विविध सांस्कृतिक कार्यक्रमासह भव्य असे कोकण फेस्टिव्हल २०२६ चे आयोजन शुक्रवार दि. १२ डिसेंबर ते सोमवार दि. २२ डिसेंबर पर्यंत करण्यात आले आहे. या कोकण फेस्टिव्हलला दिग्गज कलाकारांसह नेते देखील हजेरी लावणार आहेत.
या महोत्सवमध्ये विविध खाद्य पदार्थ आणि भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीचा आनंद माणगांवसह, रायगड, कोकण आणि महाराष्ट्रातील असंख्य प्रेषकांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर रोजी सांयकळी ६ वाजता ढोल ताशा पथकसह या भव्य कोकण फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री तसेच माहेराची साडी फेम अलका कुबल- आठले, चला हवा येवु द्या फेम आणि सुप्रसिद्ध निवेदक, लेखक, दिग्दर्शक डाॅ. निलेश साबळे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, माणगांवचे शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष अँड. राजीव साबळे, नगराध्यक्षा शर्मीला सुर्वे तसेच माणगांव प्रांताधिकारी, तहसीलदार, नगर पंचायत मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, माणगांव न्यायालयातील न्यायाधीश सह माणगांव मधील श्रेत्रांतील प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात माणगांव, रायगड, कोकण सह महाराष्ट्रातील विविध श्रेत्रांतील उल्लेखनीय काम करणा-या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा विशेष सन्मान प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते केला जाणार आहे. तसेच शाळा व महाविद्यालयात विद्यार्थांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शॉर्टफिल्म फेस्टिव्हल, काव्य वाचन, गीत गायन, अभिनय स्पर्धा, लावण्यवती स्वाती पुणेकर यांचा लावणी कार्यक्रम, बाॅडी बिल्डींग, रेकाॅर्ड डान्स आणि खास कोकण सुंदरी अशा अनेक स्पर्धा तसेच १४ भाषेत आणि ४५०० हुन जास्त विक्रमी प्रयोग केलेला कौटुंबिक विनोदी नाटक ऑद द बेस्ट व महाराष्ट्राचे सुपरस्टार आणि हास्य टाॅनिक भाऊ कदम यांचा सिरीयल किल्लर हा धमाल कौटुंबिक विनोदी नाटकसह अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची अस्सल मेजवाणी खास दर्दी व हौशी रसिक प्रेक्षकांना पाहावयास मिळणार आहे.
तरी माणगांवात प्रथमच होणा-या या कोकण फेस्टिव्हल २०२५ मुळे रायगड मधील लहान थोरांना एक अस्सल महोत्सवाचा आस्वाद घेता येणार आहे. गेली १५ वर्ष डॉ. अजय मोरे यांच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे दमदार आयोजन माणगाव येथे करण्यात येते. सांस्कृतिक चळवळ पुढे चालू रहावी या उद्देशाने डॉ. अजय मोरे व त्यांचे सहकारी गेली अनेक वर्ष या क्षेत्रात काम करीत आहेत. कोकण फेस्टीव्हल २०२५ उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्रसह कोकणातील सर्व प्रेक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रायगड सांस्कृतिक कला मंडळ, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक नातं जपणार व्यासपीठचे निमंत्रक व संस्थापक- अध्यक्ष डाॅ.अजय आत्माराम मोरे सेक्रेटरी अंकीता अजय मोरे, कार्याध्यक्ष प्रमिला हितेनभाई छेडा व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.


































