पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २२- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून रायगड जिल्ह्यामध्ये विविध राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. भारतीय जनता पार्टीने देखील माणगाव तालुक्यात गोरेगाव निजामपूर मंडळाकडून पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या पदामध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. यालाच अनुसरून निजामपूर विभागातील भारतीय जनता पार्टीचे युवा व उमदे नेतृत्व विशाल पाशिलकर यांची भारतीय जनता पार्टीच्या निजामपूर विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
विशाल पाशिलकर यांना निजामपूर विभाग अध्यक्षपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र पक्षनेतृत्वाकडून सुपूर्द करण्यात आले आहे. हे नियुक्ती पत्र जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र (नाना) महाले, ज्येष्ठ मार्गदर्शक बापूसाहेब सोनगिरे, तालुका अध्यक्ष युवराज मुंढे, तालुका सरचिटणीस प्रदिप गोरेगावकर, तालुका उपाध्यक्ष अशोक यादव, तालुका चिटणीस राजीव परांजपे, युवा मोर्चा गोरेगांव शहर अध्यक्ष यश मोने यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सुरज पाशिलकर, आदर्श पवार, राहुल दांडेकर, जयेश भऊड, ऋतिकेश भऊड, स्वप्निल जाधव, वैभव पाशिलकर हे उपस्थित होते.
विशाल पाशिलकर यांच्या या नियुक्ती नंतर विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. भाजप मा. अध्यक्ष तथा जिल्हा चिटणीस गोविंद कासार, युवा उद्योजक व विधानपरिषद गटनेते आ. प्रवीण दरेकर यांचे निकटवर्तीय राकेश गोसावी यांनी देखील फोनवरून विशाल पाशिलकर यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी मी पक्षांनी दिलेली जबाबदारी इमाने इतबारे पार पाडुन निजामपूर विभागात पक्ष संघटना वाढीसाठी व बळकट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत विशाल पाशिलकर यांनी व्यक्त केले आहे.





































