पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २४- निजामपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पाटणूस पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. पाटणूस पंचायत समिती गणात गाव बैठका, गाठीभेटी यांचा जोर वाढला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला युवकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्याचा अनुभव असलेले ॲड. राजीव साबळे हे निजामपूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी असल्यामुळे निजामपूर जिल्हा परिषद मतदार संघातील निवडणूक लढत अधिकच चुरशीची होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. निजामपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पाटणूस व निजामपूर पंचायत समिती गणातून विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणार आहे. निजामपूर पंचायत समिती गणातून गणेश पवार यांनी देखील प्रचारात आघाडी घेतली आहे .
८९ पाटणूस पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजोग एकनाथ मानकर हे निवडणूक लढवित आहेत. तरुण, तडफदार, सामाजिक कार्याची उत्तम जाण असलेला, गोर गरिबांच्या मदतीला नेहमी एक पाऊल पुढे असलेला कार्यकर्ता म्हणून संजोग मानकर यांची ओळख आहे. गेली अनेक वर्ष संजोग मानकर यांच्या माध्यमातून कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक कार्यात अनेक कामे करण्यात आली आहेत. शासनाच्या योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी केले आहे. संजोग मानकर तरुण व कार्यक्षम उमेदवार असल्याने पाटणूस पंचायत समिती गणातील युवक त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत.





































