पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १८- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तसेच खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सुभाष दळवी (दाजी) यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्हा चिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती दिनांक १४ जुलै रोजी एका विशेष कार्यक्रमात अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दळवी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
या नियुक्तीबाबत बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले, सुभाष दळवी हे पक्षनिष्ठ, अनुभवी आणि संघटनात्मक क्षमता असलेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक बळकट होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत नामदार मंत्री आदिती तटकरे, कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, अॅड. राजीव साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना दळवी म्हणाले, माझ्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवीन. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा उंचावण्यासाठी मी सतत कार्यरत राहीन. या निवडीबद्दल दीपक जाधव, शेखर देशमुख, बाबूशेठ खानविलकर, उदय अधिकारी आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


































