पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. १४- संगीत प्रेमी म्युझिकल ग्रुप माणगाव प्रस्तुत ‘सूर तेच छेडीता’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर रोजी माणगाव येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात गायक डॉ. सचिन चव्हाण, गायक डॉ अक्षरा चव्हाण, डॉ श्रीकांत वैद्य, राजा पोवार, डॉ. चंद्रशेखर साकोलीकर, गायक व निवेदक सौ स्नेहल परांजपे, गायक डॉ स्नेह राऊत, गायक व निवेदक ॲड मोहन मेथा, डॉ. सुकेशिनी डोंगरे, धनश्री मेहता, रजनी शेट, आशा राऊत, तालमणी राकेश मिस्त्री, हार्मोनियम अनंत करंदीकर आदी कलाकार सादरीकरण करणार आहेत. हा कार्यक्रम मुंबई गोवा महामार्गावरील ज्योती बंगला येथे सकाळी ६ ते ८.३० वा. होणार आहे. या कार्यक्रमासाठी सुरेश बुटाला, ज्योती बुटाला यांनी विशेष सहकार्य केले असून या कार्यक्रमाचा आस्वाद सर्वांनी घ्यावा असे आवाहन ॲड. मोहन मेथा यांनी केले आहे.


































