पोलीस प्रवाह न्युज
माणगाव, दि. २६- माणगाव पोलीस आपले कर्तव्य नेहमीच चोखपणे बजावत असतात. त्यासोबत अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवतात. अशीच एक दमदार कामगिरी करीत माणगाव पोलीसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवून दिला आहे.
माणगाव पोलीस ठाणे हद्दीत दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी विदया नगर सिध्दी कॉम्प्लेक्स रूम नंबर ११२ मध्ये घडला फिर्यादी रविंद्र सोनु पादीर यांच्या राहत्या घरातून सोन्याचे दागीने व रोख रक्कम घरफोडी करून चोरीस गेले होते. या गुन्हयाचा तपास पो. नि. निवृत्ती बो-हाडे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. नरेंद्र बेलदार, पो. ह. सुरज फडताडे, पो. शि. युवराज दहिफळे यांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीचा शोध घेवुन आरोपी कोमल गणेश महाडीक रा. विदया नगर सिध्दी कॉम्लेक्स हिला अटक करून फिर्यादी यांचा चौरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
यामध्ये ७१.५०० ग्राम वजनाचे काळे मनी असलेले मंगळसुत्र किंमत सुमारे २८६०००, ७.२५० ग्रॅम वजनाचे एक नेकलेस रु. ८००००, दोन कानातील सोन्याच्या रिंग ५.९५० गॅम किंमत रु. २३०००, रोख रक्कम २२००० असा एकूण ८,६१,००० रुपयांचा मुद्देमला जप्त करण्यात करून दि. २५ फेब्रुवारी रोजी फिर्यादी रविंद्र सोनु पादीर यांना पोलीस ठाण्यात बोलावुन परत केला आहे.
तसेच माणगाव पोलीस हद्दीत दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी १०.३० ते ११.०० वा. चे दरम्यान फिर्यादी दिनेश मधुकर केकाणे रा. लोणशी यांच्या घरात चोरी झाली होती. या गुन्हयाचा तपास पो.स.ई. आघाव, पो.शि. विकास ढाकणे यांनी कौशल्यपुर्ण तपास करून आरोपीचा शोध घेऊन संकेत मुकुंद अजर्लेकर रा. दापोली यास अटक करून फिर्यादी यांचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये एक सोन्याचे कानाचे नक्षीदार जोड वजन ५.३७० ग्राम किंमत ३८६०० रूपये, एक सोन्याचे कानाचे नक्षीदार कोड त्याचे वजन ३.५७० गॅम किंमत २५७०० रूपये असा एकण ६४,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून २५ फेब्रुवारी रोजी फिर्यादी दिनेश मधुकर केकाणे यांना पोलीस ठाण्यात बोलावून परत केला आहे. माणगाव पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
































