पोलीस प्रवाह न्युज
करमाळा, दि. ८- करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी करत २४ तासाच्या आत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. ५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र व चांदीचा छल्ला असा एकुण ५,८०,०००/-रूपये किंमतीचा ऐवज चोराकडून जप्त केला आहे.
यात हकिगत अशी कि, दि ०४/०१/२०२६ रोजी सकाळी ०८ वाचे सुमारास फिर्यादी नामे सुलोचना मच्छिंद्र लोहार वय. ६० वर्षे रा. डोंबीवली, गोग्रासवाडी ता. कल्याण जि.ठाणे या त्यांचे नातुच्या लग्नाला मौजे वरकटणे ता. करमाळा येथे आलेल्या होत्या. लग्न कार्यकमानंर त्या त्यांचा भाचा बाबासाहेब नंदरगे रा. महेंद्रनगर, करमाळा येथे मुक्कामी थांबवून दुस-या दिवशी त्या परत आपले गावी जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळी त्यांनी त्यांचेजवळील ५ तोळे वजनाचे गंठण व चांदीचा छल्ला हे पर्समध्ये काढून ठेवले होते. त्यानंतर त्या करमाळा एस.टी. स्टॅण्ड, करमाळा, येथून पंढरपुर ते वाडा जाणारे एस.टी. बसमध्ये बसल्या फिर्यादी सुलोचना लोहार या टिकीटाचे पैसे देतेवेळी पर्समध्ये ठेवलेले गंठण व छल्ला त्यांना दिसला नाही. त्यावेळी त्यांचे लक्ष्यात आले कि, बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे पर्समधून गंठण व छल्ला चोरून नेला आहे. तरी त्याबाबत दि. ०५/०१/२०२६ रोजी करमाळा पोलीस ठाणेस गुरनं. ०५/२०२६ बी एन एस कलम ३०३(२) प्रमाणे सुलोचना लोहार यांनी गुन्हा दाखल केला होता.
त्याअनुषंगाने करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक तात्काळ गुन्हा घडले ठिकाणी जावून गुन्हा उघडकीस आणणेकामी लागलीच स्टॅन्डवरील सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाआधारे तपास करून नमुद गुन्हा हा आरोपी नामे रविता प्रशांत भोसले रा. परंडा ता.परंडा जि.धाराशिव व आशा लखन पवार रा. महातपुरी ता. गंगाखेड जि.परभणी यांनी केल्याचे निष्पन्न झाले. लागलीच नमुद आरोपीचा शोध घेणे कामी करमाळा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक रवाना झाले. आरोपींचा तांत्रिक विश्लेशनाधारे तपास केला असता ते अहिल्यानगरकडे गेले असलेने त्यांचा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक पाठलाग करत करत पिंपळगांव रोठा ता पारनेर जि. अहिल्यानगर येथील खंडोबा देवस्थान यात्रेत तांत्रिक विश्लेषनाधारे त्यांचा शोध घेत असताना परत ते आरोपी हे तेथून आळेफाटा, नारायणगाव जि.पुणे असे पोहचले. त्यानंतर त्यांचा नारायणगांव जि पुणे एसटी स्टॅन्ड परिसर, चौक, हॉटेल व लॉजेस याठिकाणी त्यांचा शोध घेतला असता ते मिळूण आलेने त्यांना करमाळा पोलीस ठाणेस आणून त्यांना अधिक विश्वासात घेवन अधिक चौकशी केली असता त्यांनी करमाळा एस.टी. स्टॅण्ड येथन चोरी केल्याची कबली दिल्याने त्यांना नमुद अटक करण्यात आली आहे. तरी नमुद आरोपीतांकडून ५ तोळे सोन्याचे गंठण व चांदीछल्ला असा एकूण ५,८०,०००/- रूपये किंमतीचे मददेमाल हस्तगत करण्यात आला असून सदरचा गुन्हा हा २४ तासांत उघडकीस आणलेला आहे नमुद गुन्हयाचा पुढील तपास पोहेका पी.टी. आरकिले हे करत आहेत.

































